Honey Trap : पाकिस्तानी सुंदरीच्या जाळ्यात अडकला जवान, लष्कराची गुप्त माहिती शेअर केल्यानं खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थान गुप्तचर विभागाच्या राज्य विशेष शाखेने लष्कराच्या एका जवानाला अटक केली आहे. हनी ट्रॅपचा (Honey Trap) शिकार झालेला हा जवान भारतीय लष्कराची गुप्तचर माहिती पाकिस्तानी एजन्सीला पाठवत असल्याचं उघड झाल्यानंतर हि कारवाई करण्यात आली. तपासानंतर गुप्तचर विभागाने प्रदीप कुमार या लष्करी जवानाला अटक केली आहे.

जोधपूर रेजिमेंटमध्ये तैनात असलेले लष्करी शिपाई प्रदीप कुमार सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर सीआयडी इंटेलिजन्सची प्रदीपवर करडी नजर होती अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाचे डीजी उमेश मिश्रा यांनी दिली आहे. यादरम्यान प्रदीप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाक एजन्सीच्या महिला एजंटशी सतत बोलत असल्याचे समोर आले. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्कराची माहिती महिला एजंटला पाठवत होता. प्रदीप हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचं लक्षात येताच 18 मे रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला शनिवारी अटक करण्यात आली. Honey Trap

फेसबुक वरच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी मुंबईच्या या पठ्ठ्यानं थेट पाकिस्तान गाठलं, पुढे झालं असं काही!!

राज्य विशेष शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत प्रदीप कुमार (२४) हे तीन वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाल्याचे समोर आले. त्यांची जोधपूर येथील अतिसंवेदनशील रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सुमारे 7 महिन्यांपूर्वी एका महिलेचा प्रदीप यांना मोबाईलवर कॉल आला. तिने आपले नाव रिया असं सांगितलं. ती मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरची रहिवासी असून सध्या मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस, बंगळुरूमध्ये तैनात असल्याचं त्या महिलेनं प्रदीप यांना सांगितलं. यानंतर त्यांच्यात सतत फोनवर बोलणे होऊ लागले.

पाकिस्तानी महिला एजंटने प्रदीपला हनी ट्रॅपमध्ये अडकवले. दोघांमध्ये व्हॉट्सअॅप चॅट, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू झाले. प्रदीपला दिल्लीत भेटून लग्न करण्याच्या बहाण्याने महिला एजंटने लष्कराच्या गुप्त कागदपत्रांची छायाचित्रे मागायला सुरुवात केली. यानंतर प्रदीपने तिला व्हॉट्सअॅपद्वारे गोपनीय माहिती देण्यास सुरुवात केली. Honey Trap

प्रदीपने आपला नंबर एका पाकिस्तानी महिला एजंटलाही दिल्याचे तपासात समोर आले आहे. याद्वारे पाकिस्तानी एजंटने भारतीय क्रमांकाने व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करून ऑपरेट केले. या महिला एजंटने लष्करातील इतर जवानांनाही आपल्या जाळ्यात अडकवले असल्याची शक्यता आहे. राज्य विशेष शाखेचे अधिकारी व्हॉट्सअॅपद्वारे याची माहिती गोळा करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Gold Loan : पैशांची गरज भासतेय ??? ‘या’ बँकांकडून स्वस्त दरात मिळेल गोल्ड लोन

डीजी कॉलेजवर राडा : दोन महाविद्यालयीन युवकांच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार

धक्कादायक ! लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केली आजीची हत्या

OMG! प्रियांका चोप्राच्या तोंडाला झाली जखम? फोटो होतोय व्हायरल

Online Banking : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत ??? अशा प्रकारे परत मिळवा

Leave a Comment