शिर्डी प्रतिनिधी | काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ठसल्ल देण्यासाठी काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना रिंगण्यात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सत्यजित तांबे हे आक्रमक नेते म्हणून गणले जातात. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधात या पाच वर्षात चांगलेच तापवले आहे.
शिर्डी हा मतदारसंघ विखे पाटील घरण्याचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेच्या मागील ५ निवडणुका जिंकले आहेत. १९९५ ते आज तागायत म्हणजे २५ वर्षाचा प्रदीर्घ काळ त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करणे तसे कधींच आहे. मात्र तरुण चेहऱ्याला काँग्रेसने संधी दिल्यास याठिकाणी चांगली लढत बघायला मिळेल.तर भाजपला या मतदारसंघात याआधी कधीच विजयी सलामी देता आली नाही त्यामुळे भाजप यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रूपाने विजय संपादित करू पाहते आहे.
महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे नाव शिर्डीसाठी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ते काँग्रीसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. विखे थोरातांचे विळ्या भोपळ्याचे वैर असल्याने ते आपल्या भाच्याला विखेंच्या विरोधात उतरवू शकतात असे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान आपण कोणत्याच विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. मात्र आपल्या नावाची काही कार्यकर्त्यांनी शिर्डीतून लढण्यासाठी शिफारस केली आहे असे सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून जाहीर केले आहे.




