औरंगाबाद – लंडनहून शहरात आलेल्या 50 वर्षीय कोरोना पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत पण त्यांच्या मागणीवरून त्यांना बेल्ट्रॉन मधून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील वीज कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, सात दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली जाणार आहे.
नातेवाइकांच्या लग्नासाठी लंडन होऊन मुंबईत आलेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी रविवारी ओमिक्रोन बाधित आढळली. औरंगाबादेत तपासणीअंती बाधित मुलीचे वडील कोरोना बाधित आढळले. मुंबईत असलेल्या मुलीचे आई-वडील व बहीण शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील वीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. कोरोना बाधित जेष्ठाचे नमुने जिओमिक्स स्क्विन्सिंग अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत.
लंडनहून निघताना कुटुंबातील चौघेही जण कोरोना निगेटिव होते. पण मुंबई विमानतळावर तपासणीत मुलगी कोरोना बाधित आढळली. तर उर्वरित तिघे निगेटिव्ह आढळले. मात्र औरंगाबादेतील तपासणीत वडील कोरोना बाधित आढळले आहेत.