मुंबई | भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळं चित्र निर्माण केलं जात आहे. भारत देशाला बदनाम करून देशाची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे हे मोठ षडयंत्र असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आह.
संजय राऊत यांनी हा गंभीर दावा केला. खासदार राऊत म्हणाले, आपल्या देशाचा अपमान होत असताना मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी सर्वांनी उभ राहिल पाहिजे. भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी राजकारण विसरण्याची गरज आहे. भारत देशाचा अपमान होत असेल तर मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. विदेशी सोशल मीडिया, विदेशी मीडियात भारताचं जे काही चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यातून भारताचं सामाजिक स्वास्थ आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे षडयंत्रं असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्रं येऊन लढलं पाहिजे, असंही मत संजय राऊत त्यांनी व्यक्त केलं.
निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला
मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावं, हे योग्य नाही. निवडणुका आणि कोरोनाचा काही संबंध नसल्याचं भाजपचे नेते सांगत होते. पण चित्रं वेगळं आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना फैलावला असं आपण म्हणतो. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला.