कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत आज झालेल्या लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ९ हजार निवेदने दाखल झाली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडवावेत. होणार नसतील तर तसे त्यांना पत्राव्दारे कळवावे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले. नागरिकांना ‘हे माझे सरकार आहे,’असं वाटलं पाहिजे. नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नयेत अशा पध्दतीने अधिकाऱ्यांनी त्यांची कामे करावीत, अशा सूचना  हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.

शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात तीनही मंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकशाही दिनाची सुरूवात करण्यात आली. यानंतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदने स्वीकारण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने उपस्थित होते.

अगदी सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागातील आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी शिस्तबध्द नियोजन केले होते. आजच्या निवेदनामध्ये वैयक्तिक तक्रारींपासून विविध विभागांच्या संदर्भात सार्वजनिक समस्यांबाबतचा समावेश होता. पालकमंत्री श्री. पाटील, ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. यड्रावकर हे तक्रारीच्या अनुषंगाने उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना करत होते.

पाणंद रस्ता खुला करणे, रस्त्यांची दुरूस्ती, मायक्रो फायनान्सचा प्रश्न, शिक्षण विभागाशी संबंधित, महापालिका, जिल्हा परिषद, कृषी, एसटी, महसूल, आरोग्य, इचलकरंजी नगरपरिषद अशा विविध विभागांशी संबंधित समस्या मांडल्या जात होत्या. अंध तसेच दिव्यांग अर्जदारही आपल्या समस्या मांडत होते.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

‘हे गांधी किंवा खानचे सरकार नाही!’ भाजप खासदार परवेश वर्माने पुन्हा एकदा केलं वादग्रस्त विधान

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमधून जखमी रोहित शर्मा ‘आउट’ ; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

Leave a Comment