हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात जवळपास 31 कोटी लोक मधुमेह या आजराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजराचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि काळानुसार बदलत चाललेले आहार याचे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या काळात मधुमेह नियंत्रित आणला जाऊ शकतो. योग्य प्रकारे व्यायाम आणि नियमित योगा केल्याने आपण हा आजार दूर ठेवू शकतो.
त्वचेचा त्रास—
जर तुम्हाला त्वचेचा त्रास जास्त असेल तर किंवा त्वचेच्या दाह याच्या समस्या निर्माण झाल्या तर आणि त्वचा जर लाल पडत असेल तर किंवा गळ्याच्या भोवताली जर सुरकुत्या पडत असतील तर तुम्हाला काही प्रमाणात मधुमेहाची लक्षणे आहेत.
अंधुक दृष्टी—-
जर काही प्रमाणात दिसणे कमी झाले असेल तर तुम्हाला मधुमेह याचा आजार आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण जर वाढले असेल तर तुमच्या डोळ्याचा बुबुळे लहान होतात. त्यामुळे दृष्टीवर याचा परिणाम होतो.
जास्त तहान लागणे– —
ज्या लोकांना मधुमेह याची लक्षणे आहेत त्या लोकांना सारखं तहान लागते कारण त्याचे मूत्रपिंड ग्लुकोज तयार करते. त्यामुळे तहान लागण्याचे प्रमाण जास्त असते. अश्या वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वजन कमी होणे—
दोन ते तीन महिन्यात अचानक तीन चार किलो वजन कमी होणे हे मधुमेहाची लक्षणे आहेत. कारण जर वजन कमी होत असेल तर आपल्या शरीरातील ग्लुकोज हे योग्य पेशींना मिळत नाही त्यामुळे वजन कमी होते.
आळशीपणा—
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून शरीर आळशी बनते. कितीही काळ तुम्ही गादीवर पडून राहिला असला तरी तुमचा आळस काही केल्या जात नाही.
सतत भूक लागणे —
काही वेळेला शरीरातील साखरेचे प्रमाण कमी कमी होत गेल्यास तुम्हाला सतत भूक लागते. त्यावेळी सुद्धा मधूमेह याचा धोका असू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’