हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी जीवनसाठी शरीर मजबूत असं आवश्यक असते. त्यासाठी काजू, बदाम, मनुका यांसारखे ड्राय फ्रुट खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. ड्राय फ्रुट मधील मनुका (raisins) हा सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. मनुक्यामध्ये लोह, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. मनुके खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात. परंतु मनुक्याचे सेवन हे योग्य प्रकारे केलं पाहिजे. कसेही मनुके खाऊन काही उपयोग नाही. त्यामुळे मनुके नेमके कसे खावेत याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रिकाम्या पोटी मनुका खाणे –
जेव्हा तुमचं पोट मोकळं असत अशावेळी मनुका खाल्ल्यास तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. याशिवाय रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने आपली पचनक्रियाही मजबूत होते.
दुधासोबत मनुका –
जर तुम्ही दुधात भिजवून मनुके खाल्ले तर त्याचे मोठे फायदे मिळतात. दुधात भिजवलेले मनुके खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि शरीरातील कमजोरी दूर होते. आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
पाण्यासोबत मनुका-
जर दुधासोबत मनुके खाणे तुम्हाला शक्य नसेल तर पाण्यात टाकूनही तुम्ही ते खाऊ शकता. मनुके पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्यासाठी रात्रभर तुम्हाला मनुके पाण्यात भिजवून ठेवावे लागतील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खावं लागेल. पाण्यासोबत मनुके खाल्ल्यास तुमच्या शरीराला अतिरिक्त ऊर्जाही मिळेल.
दुधात उकळून मनुका –
मनुका दुधात उकळून खाल्ल्याने शरीराला अजून जास्त फायदा होतो. यासाठी एका ग्लास मध्ये दूध घेऊन त्यात काही मनुके टाका आणि हे दूध उकळून घ्या. हे दूध घट्ट झाल्यावर थंड करून खा. शक्यतो रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्यास शरीराळा चांगला फायदा होतो.