हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली जवळ बोरघाटात 3 ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महामार्ग पोलिस दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे ४ वाजता हा अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर खोपोली जवळ बोरघाट उतरताना तीन वाहनांती एकमेंकांना धडक दिली. या धडकेत कंटेनर ट्रक सुमारे शंभर फूट खोल दरीत कोसळला. तसेच, आणखी एका ट्रकची कॅबिनही दरीत कोसळली. या अपघातात ट्रक आणि कंटेनरमधील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे.
धारावीचा पुनर्विकास अदानी समूह करणार; 5069 कोटींची बोली जिंकली
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/XkjqeyjOZT#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 30, 2022
शंभर फूट खाली गेलेल्या दोन्ही गाड्यांना आणि त्यातील काही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर 140 पेक्षा अधिक अपघातांची नोंद ही 2022 या वर्षांच्या पहिल्या 9 महिन्यातच झाली आहे. यामधील अनेक अपघात हे लेन कटिंगमुळे होत असल्याचंही समोर आलं होतं.