नागपूर : हॅलो महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल सभागृहात ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘‘शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे लहान वयातच विकृत दृष्टिकोन तयार होतो. त्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही विकृती रोखण्यासाठी पोर्नोग्राफीक मजकुरावर संपूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असून यासाठी राज्यात सायबर प्रकल्प तयार करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व संकेतस्थळावरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे. राज्यात इंटरनेटवरील मजकुरावर आणि वेबसाइटवर प्रतिबंध घालण्याचे काम सुरु आहे. सायबर गुन्ह्यांबाबत सायबर गुप्तचर विभाग प्रकल्प प्रस्तावित आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल,’’ असेदेखील फडणवीस (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.
यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल. किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलिस दीदी’ यासारखे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती, कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सभागृहात दिली.
हे पण वाचा :
Flipkart वर 21,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 11
दुधारू जनावरांचा विमा काढल्यास मिळणार 88 हजार रुपये नुकसान भरपाई, जाणून घ्या किती असणार प्रिमिअम
कठोर परिश्रम करू, पुन्हा लढू; गुजरात निकालावर राहुल गांधींचे Tweet
केवळ 10 रुपयांमध्ये करा आता 150 किलोमीटरचा प्रवास, आझमगडच्या तरुणाचा अप्रतिम शोध
भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?