शहाजी बापू पाटलांनी आता तमाशात कविता कराव्या; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची जोरदार टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गट प्रथमच समोर आले. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी सीमावादाबरोबरच राज्यातील अनेक समस्यांचा प्रश्न मांडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधारी गटावर अनेक प्रश्नांवरून टीका केली. यानंतर सत्ताधारी गटातील गुलाबराव पाटील, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) आणि आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले. यानंतर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी आमदार गुलाबराव पाटील आणि शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांचा खरपूस समाचार घेतला.

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी हिवाळी अधिवेशन चालू असतानाच गुवाहाटी दौऱ्याची आठवण सांगत नागपूरमध्येही त्यांनी त्यावर कविता केली. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी तमाशामध्ये जाऊन कविता कराव्यात अशी खोचक टीका केली.

नेमके काय म्हणाले शरद कोळी?
गुवाहाटी दौऱ्यावर असताना आमदार शहाजी बापू पाटील याचे काय हॉटेल, काय डोंगार… हा डायलॉग प्रचंड गाजला होता. सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांच्यावर टीका करताना ते आता फक्त चर्चेत राहण्यासाठी कविता वगैरे करतात. मात्र आता त्यांचा करिश्मा संपला असून त्यांनी आता फक्त तमाशामध्ये जाऊन कविता करायच्या अशी खोचक टीका ठाकरे गटाने त्यांच्यावर केली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती