हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Activa Electric Scooter : आता लवकरच बाजारात होंडाच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रिक व्हर्जनही दाखल होणार आहे. होंडा कंपनीने स्वतःच अॅक्टिव्हाच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर काम सुरू असल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे आता येत्या काही दिवसांत कंपनीकडून ऑल-इलेक्ट्रिक Honda Activa स्कूटर लॉन्च केली जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. हे जाणून घ्या कि, भारतात अॅक्टिव्हा खूपच लोकप्रिय असल्याने, अॅक्टिव्हाच्या इलेक्ट्रिक मॉडेलकडे आता लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
मात्र लॉन्च झाल्यानंतर ती किती दिवसांनी खरेदीसाठी उपलब्ध होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे जाणून घ्या कि, इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा किटद्वारे सामान्य अॅक्टिव्हाला इलेक्ट्रिक मध्ये रूपांतरित करता येते. सध्या लोकं आपल्या स्कूटरचे अशा प्रकारे रूपांतर करून घेत आहेत. Activa Electric Scooter
अशा प्रकारे आपल्या पेट्रोल मॉडेलला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करा
Honda Activa साठी सांगितले गेले कि, आफ्टरमार्केट कन्वर्जन किट DIY Tech, नेल्लोर-बेस्ड मॉडिफिकेशन हाऊसने लाँच केले आहे. त्यांच्या YouTube व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये या किटबाबतची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये, मॉडिफिकेशन हाऊसच्या मालकाने कोणत्याही नियमित होंडा अॅक्टिव्हाला EV मध्ये रूपांतरित करू शकणारे कंपोनेंट आणि प्रक्रियेची माहिती दिली आहे. Activa Electric Scooter
किट कसे काम करते ???
एका प्रोजेक्ट अंतर्गत DIY Tech ने Honda Activa 5G घेतली आणि 110cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिनला पूर्ण इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसहीत बदलले. यामध्ये इंजिनच्या जागी, अॅक्टिव्हाला इलेक्ट्रिक बॅटरी मिळते, जी हब-माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसहीत काम करते जी स्कूटरच्या मागील चाकाला पॉवर देते.
किती खर्च येईल???
DIY टेकच्या मते, या इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किटद्वारे नियमित Honda Activa चे रूपांतर करण्यासाठीचा संपूर्ण खर्च जवळपास 1 लाख रुपये इतका आहे, जो स्कूटरची किंमत वगळून आहे. DIY टेक म्हणते की,” 1 लाख रुपयांपैकी जवळपास निम्मी किंमत ही बॅटरीसाठीची आहे. यामध्ये वापरलेल्या बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी देखील दिली जात आहे. Activa Electric Scooter
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bikewale.com/honda-bikes/activa-electric/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता