सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असताना शनिवारी संशयित रुग्णांच्या उच्चांकी 10 हजार 457 चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यातून नव्याने 1 हजार 10 रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हीटी दर 9.91 टक्क्यांवर आला. तर 24 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 4 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 142 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 12, कडेगाव 93, खानापूर 58, पलूस 45, तासगाव 88, जत 62, कवठेमहांकाळ 49, मिरज 113, शिराळा 89 आणि वाळवा तालुक्यात 259 रुग्ण आढळले. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 1 रुग्ण आढळला.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सरासरी सात हजार चाचण्यांचे प्रमाण कायम राहिले होते. शनिवारी कोरोना संशयित रुग्णांच्या उच्चांकी 10 हजार 457 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 3160 पैकी 379 बधित तर 7297 अँन्टीजेन चाचणीमध्ये 658 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1010 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट 9.91 टक्क्यांपर्यंत खाली आला. जिल्ह्यातील 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 3, मिरज शहर 1, वाळवा तालुक्यातील 5, पलूस, कडेगाव व खानापूर प्रत्येकी 3, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
महानगरपालिका क्षेत्रात नव्याने 142 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 114 तर मिरज शहरात 28 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 12, कडेगाव 93, खानापूर 58, पलूस 45, तासगाव 88, जत 62, कवठेमहांकाळ 49, मिरज 113, शिराळा 89 आणि वाळवा तालुक्यात 259 रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 1 रुग्ण आढळला. आजपर्यंत म्युकरमायकोसीसचे 239 रुग्ण आढळून आले. तर चौदा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख 29 हजार 389 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार 718 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख 16 हजार 634 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 9 हजार 37 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 7 हजार 255 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.