नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा फैलाव गेल्या काही दिवसात वेगात होत असल्यानं कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ६० हजारांची संख्या गाठल्यानंतर आज दोनच दिवसांनी ही संख्या ७० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही गेल्या ६ दिवसांपासून रुग्णसंख्या दररोज १ हजाराहून अधिक वाढत आहे.
तामिळनाडूतही कोरोनाचे रुग्ण झापाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७९८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही दिवसभरातील राज्यातील सर्वाधिक आहे. मात्र, एकूणच, देशभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या रविवारी ४,३०८ इतकी नोंदवली गेली. त्यात सोमवारी घट होत ती ३,६०७ वर आली. राज्यांद्वारे नोंदविलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात आता ७०,७९३ इतके रुग्ण आहेत.
महाराष्ट्रात एकूण रुग्णांपैकी जवळजवळ एक तृतीयांश रुग्ण आहेत. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्ली या ४ राज्यांत भारतातील कोरोना रुग्णांपैकी ६६ टक्के रुग्ण आहेत. गुजरातमध्ये सोमवारी ३४७, दिल्लीत ३१० रुग्ण आढळले. ही संख्या आतापर्यंत आढळलेल्या रुग्णसंख्येहून जास्त आहे. देशातील ११३ वर असलेला मृत्यूदर सोमवारी ८२ वर घसरला होता ही एक समाधानाची बाब. महाराष्ट्रात सर्वाधिकक ८६८ मृत्यू झाले, तर एकट्या मुंबईत ५२८ मृत्यू झाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”