औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून एकाच दिवसात 550 कोरोनाचे नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर 8 रूग्णाचा मु्त्यु झाला आहे. तर 3 हजार 221 अँक्टिव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. आज 373 रूग्णांना (मनपा 337, ग्रामीण 36) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 49 हजार 382 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 हजार 907 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 304 जणांचा मृत्यू झाला आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
या आठ कोरोना बाधितांचा मृत्यू
घाटीत मोरहिरा औरंगाबाद येथील 32 वर्षीय पुरूष, वैजापुरातील 75 वर्षीय पुरूष, चैतन्य नगर, सिडकोतील 49 वर्षीय स्त्री, रेल्वे स्टेशन परिसरातील 51 वर्षीय स्त्री, उस्मानपुरा येथील 84 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील 65 वर्षीय पुरूष, शहरातील नॅशनल कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष आणि 69 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (462) : एन दोन सिडको (4), शासकीय कर्करोग रूग्णालय परिसर (1), सिडको (2), गारखेडा (7), ब्रिजवाडी (1), सातारा परिसर (11), एसआरपीएफ कॅम्प (1), शंकुतला नगर (1), अविष्कार कॉलनी (1), जाधववाडी (3), पडेगाव (3), हिमायत बाग (5), एन सात (2), एन सहा (8), खडकेश्वर (1), नागेश्वरवाडी (2), कॅनॉट प्लेस (1), काल्डा कॉर्नर (2), राणा नगर (1), संजय नगर (2), मिलिट्री हॉस्पीटल (1), भारतमाता नगर (1), बालाजी नगर (5), अमृतसाई प्लाजाच्या मागे, रेल्वे स्टेशन परिसर (1), उस्मानपुरा (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), आकाशवाणी कॉलनी (2), जय भवानी नगर (4), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), तापडिया नगर (2), एन दोन ठाकरे नगर (2), पारिजात नगर (1), गारखेडा, शिवनेरी कॉलनी (2), मयूर पार्क (5), शहानूरवाडी (4), नक्षत्रवाडी (3), गुलमोहर कॉलनी (1), एसबी कॉलनी वेस्ट (2), टिळक नगर (3), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ, म्हाडा कॉलनी (2), एन चार (5), एन तीन (3), अरूणोदय कॉलनी (1), तोरणागड नगर (1), एन वन (5), एन पाच सिडको (2), हनुमान नगर (1), उत्तरानगरी, चिकलठाणा (2), खडकेश्वर (1), एन तीन, कामगार चौक, सिडको (2), प्रकाश नगर (1), एमआयडीसी चिकलठाणा (1), इटखेडा (2), शेंद्रा (2), बीड बायपास (5), शंकुतल नगर (1), समर्थ नगर (3), वेदांत नगर (3), विराज नगर (1), गुलमंडी (1), श्रीकृष्ण नगर, हडको (1), शहागंज (1), कासलीवाल मार्बल (3), शिवाजी नगर (4), उल्कानगरी (7), रेणुका नगर (1), छत्रपती नगर (3), सवेरा कंपनी परिसर (2), विद्या नगर (1), अलंकार हा.सो (1), पुंडलिक नगर (1), जाधवमंडी (1), जय भवानी विद्या मंदिर परिसर (1), ज्ञानेश्वर नगर (1), इंदिरा नगर (1), विजय नगर (1), खिवंसरा पार्क (1), मिटमिटा (2), दशमेश नगर (2), व्यंकटेश कॉलनी (1), केंब्रिज स्कूल परिसर (2), अशोक नगर (2), बालकृष्ण नगर (2), मयूर नगर (1), एन बारा सिडको (1), हर्सुल (5), तुळजाभवानी चौक (1), सौभाग्य चौक (1), एन तेरा (1), एन अकरा (2), भगतसिंग नगर (1), भावसिंगपुरा (1), संभाजी कॉलनी एन सहा (1), हडको (3), एन आठ, जिव्हेश्वर कॉलनी (1), पिसादेवी (1), हरसिद्धी माता नगर (1), फाजिलपुरा (2), एन नऊ (2), दर्गा रोड (1),एम दोन, टीव्ही सेंटर (1), कांचनवाडी (7),पंचशील नगर (1), न्यू भीमाशंकर कॉलनी (1), जटवाडा रोड (1), अष्टविनायक नगर (1), संषर्ष नगर (2), बंजारा कॉलनी (2), ओमश्री गणेश नगर (1), विष्णू नगर (2), एन आठ (1), एमआयटी कॉलेज (1), स्वराज नगर, मकुंदवाडी (1), गादिया विहार (1), पंचवटी हॉटेल परिसर (1), कोकणवाडी (1), धावणी मोहल्ला (1), विश्वभारती कॉलनी (1), बन्सीलाल नगर (3), दिशा सिल्क सिटी, पैठण रोड (1), घाटी परिसर (1), प्रताप नगर (1), संदेश नगर (1), देवळाई (2), स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी (2), न बारा हडको (1), एमआयटी कोविड केअर सेंटर (1), पेशवे नगर (3), औरा व्हिलेज (1), सूतगिरणी चौक परिसर (2), पद्मपुरा (1), स्नेह नगर (1), देवानगरी (1), अन्य (197)
ग्रामीण (88)
वैजापूर (1), बिडकीन (1), कन्नड (2), नाथ विहार पैठण (1), गंगापूर (2), रांजणगाव (2), खुलताबाद (2), फुलंब्री (1), वाळूज (2), शेणपूजी, गंगापूर (1), तालवाडी, वेरूळ (1), सिडको महानगर एक (4), बजाज नगर (9), म्हाडा कॉलनी, तिसगाव (1), साऊथ सिटी (2), लासूर स्टेशन (1), सावंगी (1), देवगाव रं (1), अन्य (53).
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.