‘या’ शहरात 3 ते ८ वयोगटातील मुलांना झालीय कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात बुधवारी कोरोना विषाणूचे २० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह राज्यात रूग्णांची संख्या वाढून ८६ झाली आहे. राज्यातील वाढत्या आकडेवारींपैकी सर्वात चिंताजनक म्हणजे राज्यात मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.राज्यातील २० नवीन कोरोना प्रकरणांपैकी १९ प्रकरणे इंदूर आणि खारगोन येथील आहेत. चिंताजनक बाब म्हणजे इंदूरमध्ये नोंदवलेली ९ प्रकरणे एकाच कुटुंबातील आहेत. इंदूरच्या तंजीम नगरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील तीन मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. ही मुले तीन, पाच आणि आठ वर्षांची आहेत. आतापर्यंत केवळ वृद्धांनाच संसर्ग झाला होता.

इंदूरमधील कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये एक पोलिस अधिकारी देखील आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गुरु प्रसाद पराशर यांनी सांगितले की, आजारी पोलिस कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलगी यांना डॉक्टरांनी रुग्णालयाच्या स्वतंत्र वॉर्डात ठेवल्या आहेत. ज्या पोलिस ठाण्यामध्ये तो पोलिस तैनात होता त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे.

एकट्या इंदूर शहरातच या साथीने बाधित झालेल्या लोकांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अलीकडील घटनांमध्ये एकट्या इंदूरमधील १९ लोकांना तीन मुलांचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्याचवेळी जबलपूरमध्ये कोरोनाचे आठ प्रकरणे नोंदले गेले आहेत. याशिवाय उज्जैन येथे सहा, भोपाळमध्ये चार, शिवपुरीमध्ये दोन, ग्वाल्हेरमध्ये दोन आणि खरगोन येथे एक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा