परभणी जिल्ह्यात करोनामुळं शाळा, आठवडी बाजार, यात्रा बंद; अफवा पसरविणाऱ्यावर होणार गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी उपाययोजना म्हणून परभणी जिल्हातील शासकीय शैक्षणिक व खाजगी संस्थासह आठवडी बाजार व यात्रा बंदचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मगुळीकर यांनी काढले असुन उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. मोठ्या शहरासह आता गावागावात कोरोनाची भिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. लहानापासून मोठ्या पर्यंत सगळेच जण आत्ता संसर्गजन्य विषाणू कोव्हीड १९ पासुन वाचण्यासाठी सतर्कता पाळत आहेत. शासनाकडुही या संसर्गजन्य व्हायरस पासुन वाचण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.

साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार जिल्हातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था , शिकवणी वर्ग, वसतीगृहे, आश्रमशाळा, आठवडी बाजार यांच्यासह यात्रा महोत्सव दि ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान १०वी व १२वीच्या बोर्डाच्या परिक्षा नियमीत वेळापत्रकानुसार होणार आहेत. यावेळी आजारी विद्यार्थांची काळजी व व्यवस्थापन केंद्रप्रमुखांनी करायचे आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या सेलू तालूक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वालुर गावातील आठवडी बाजारही शासनाच्या आदेशाने बंद ठेवण्यात येणार आहे .यांची दवंडी देऊन सर्व गावकरी व व्यापार्यांना सुचना देण्यात आली आहे.

वालुर येथे दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार हा सेलु नंतर तालुक्यातील सर्वांत मोठा बाजार आहे.वालुरसह आसपासच्या 30 गावासाठी हा जवळचा आणि महत्वाचा आहे. या भागात भाजीपाला विकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असुन आता त्यांच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी आता गर्दी कमी होत असून नागरिक रुमाल व मास्कचा वापर करताना दिसत आहेत. जिल्ह्यात अजून तरी करोनाचा रुग्ण आढळला नसल्याने, आरोग्य यंत्रनेकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेल कडून लक्ष ठेवण्यात येत असुन गुन्हे दाखल होणार असल्याचे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment