हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतासह अनेक देशांमध्ये करोणाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार करुन सोडला आहे. यामध्ये मृत्युमुखी पडण्याचा दरही जास्त असल्यामुळे या लाटेने जास्त दहशत निर्माण केली आहे. करोनाच्या नवीन स्ट्रेन मध्ये मुटेशन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे नवीन आजारांची लक्षणे रुग्णांना दिसून येत आहेत. करोना म्युटेशन आतापर्यंतच्या धोक्याच्या यादीमध्ये डायबिटीज हा सर्वात वरती असून, करोनामधून बरे झालेल्या रुग्णांना आता डायबिटीज म्हणजेच मधुमेह या आजाराचे लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे रुग्णांना अजूनच काळजी घेण्याची गरज आहे
करोनाच्या या नवीन म्युटेशनवर एक संशोधन नुकतेच समोर आले असून, त्यामध्ये धक्कादायक बाबींचा उल्लेख केला आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे करोणामधून बरे झालेल्या रुग्णांना आता डायबिटीजची लक्षणे दिसत आहेत. किंग्स कॉलेज लंडन येथील प्राध्यापक फ्रान्सेस्को रुबिनो यांनी डायबिटीज आणि करोना यांच्यातील संबंधाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांच्यानुसार करोणाच्या गंभीर लक्षणांना सामोरे गेलेल्या रुग्णांमध्ये डायबिटीजचे लक्षणेही आढळत आहेत.
चीनच्या प्रांतांमध्ये वैज्ञानिकांनी 337 रुग्णांवर अभ्यास केला त्यातील 952 रुग्ण आधीपासून टाईप टू डायबिटीसने ग्रस्त होते. संबंधित रिसर्चमधून हे समोर आले की, जर रुग्ण टाईप डायबिटीस प्रकारातील असेल तर त्याला मेडिकल ट्रीटमेंट जास्त लागते आणि मृत्यू दरही इतरांपेक्षा जास्त असतो. यामुळे या पेशंटने आपले ग्लुकोज लेवल वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सोबतच डायबिटीसची आकडेवारी वाढली असल्यामुळे वेळोवेळी त्यांनी आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.