औरंगाबाद । पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरूण काल केलेल्या कोरोना तपासणीत पाॅझिटिव्ह आढळून आला. मात्र त्या पाॅझिटिव्ह रूग्णाला रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे त्याला चक्क आपल्या दुचाकीवरून चितेगाव कोवीड सेंटर गाठावे लागले.
ढाकेफळ येथील एका तरुणाचा कोवीड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे काल सायंकाळी उशिरा माहिती मिळताच त्याने ढाकेफळ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले, माञ आरोग्य केंद्र कुलूप बंद अवस्थेत आढळून आले. त्यामुळे रूग्णाची तारांबळ उडाली. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळून आले. यावेळी रूग्णाला कुठलाही उपचार मिळाला नाही. अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूपबंद अवस्थेत होते. त्यामुळे रूग्णाची हेळसांड झाली.
नागरिकांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. माञ आज पैठण तालुक्यात एकूण ७३ रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने व १०८ रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे त्या पाँझिटीव्ह तरूणाला चक्क दुचाकीवर चितेगाव येथील कोवीड सेंटर गाठावे लागले. त्यामुळे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. या गंभीर प्रकारणावर गैरहजर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आरोग्य विभाग काय कारवाई करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou