सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. कारण आज मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार नवीन 24 बाधित झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने 100 चा आकडा पार केला आहे. मात्र, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा कमी झाला असून तो 9. 76 टक्के झाला असून एकूण बाधितांची संख्या ही 107 इतकी झाली आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 21 रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्याचा सध्या पॉझिटीव्ह रेट हा 9. 76 टक्के इतका आहे. तो काल 33.33 टक्के इतका होता. जिल्ह्यात गेल्या 12 तासात 246 रूग्णांचे आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 24 रूग्ण बाधित आढळून आलेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे केवळ 21 रूग्ण उपचार घेत आहेत. तर आज 3 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे.
मंगळवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात नवीन 24 रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये कऱ्हाड व फलटण तालुक्यांत प्रत्येकी 6 रुग्ण स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सातारा तालुका 5 आणि जावळी, माण, कोरेगाव, पाटण, वाई तालुक्यांत 1 रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 107 झाली आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच जादा प्रमाणात रुग्ण आढळून आले. मात्र, त्यानंतर कोरोना संकटाला उतरती कळा लागली. त्यामुळे गेले किमान सहा महिने नागरिक तसेच प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडलेला. मात्र, आताच्या मार्च महिन्याच्या मध्यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. एप्रिल महिना सुरु झाल्यापासून बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे.