सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. दरम्यान, कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असल्याने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये आज 5 रूग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 90 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात गत आठवड्यात 22, 32 आणि आता 30 असे कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या पॉझिटीव्ह रेट हा 10.42 टक्के इतका आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या 12 तासात 62 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 14 रूग्ण बाधित आढळून आलेत. जिल्ह्यातील विविध रूग्णालयात केवळ 12 रूग्ण उपचार घेत आहेत.