आता परभणीमध्येच कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे |

कोरोना रुग्ण स्वॅब तपासणी संदर्भात जिल्ह्यासाठी चांगली बातमी असून आता रुग्ण तपासणी अहवाल प्रतीक्षेची गरज भासणार नसून जिल्ह्याच्या ठिकाणी आता तपासणी लॅब सुरू करण्यात आली आहे. परभणी जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या पुढाकारातुन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिसोदीया पॅथोलॉजी लॅब यांच्या सहकार्याने रविवार दि. २४ मे रोजी कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे.

पूर्वी रुग्ण तपासणी अहवाल येण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागत होता. हे सर्व अहवाल पुणे व नांदेड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. दरम्यान सद्यस्थितीत आजपर्यत जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह संख्या ३६ वर पोहचली आहे.रुग्णापैकी एक उपचारामुळे कोरोनामुक्त झाला आहे तर एकाचा मृत्यू झालाय.

रविवार दि. २४ मे रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे १ हजार ८३६ व रविवारी दाखल ५४ असे एकुण १ हजार ८९० संशयीत व्यक्तींची नोंद झालेली होती. दरम्यान यापैकी उशीरा १४ जनांचे स्वॅब अहवाल नांदेड येथील प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आले आहेत असे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.