हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लसींचा मात्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे.
Dear Mumbaikars,
Please note that there will be NO VACCINATION tomorrow and day after i.e. 15th and 16th May 2021.
Please watch this space for further updates for the days ahead #MyBMCVaccinationUpdate #WeShallOvercome https://t.co/xigkipRdyS
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 14, 2021
दरम्यान, मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दोन्ही लसींचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.