इतिहासात पहिल्यांदाच टाटा समूहावर आली ‘ही’ वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून सर्व उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टाटा समूहाने इतिहासात प्रथमच टाटा सन्सचे चेअरमन आणि सहायक कंपनीचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)यांच्या पगारात  जवळजवळ २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबर व्यवहारात स्पष्टता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टाटा सन्स समूहातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त फायदा मिळवून देणारी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस (TCS)ने सर्वात प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. तर इंडिया हॉटेल्सने याआधीच सांगितले की ते वरिष्ठांच्या या तिमाहीतील पगाराचा एक भाग कंपनीला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून देणार आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच वोल्टास या सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी देखील कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षात या कंपन्यांच्या बोनसमध्ये देखील कपात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टाटा समूहाच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. यावेळी व्यवसाय वाचवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे टाटा ग्रुपमधील एका सीईओने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. टाटा समूहाची संस्कृती आहे की शक्य असेल तिथपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे. टाटा समूहाच्या आधी देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा आणि सीईओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. पण टाटाने आतापर्यंत कर्मचारी कपात केलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”