कोरोनाचा हाहाकार! देशात एकाच दिवसात तब्बल 794 जणांना मृत्यूने गाठले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली :  देशात कोरोनाचा हाहाकार सुरू होत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 45 हजार 384 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात लसीचा तुटवडा सुरू आहे काही राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. अशातच कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही देशासाठी चिंताजनक बाब बनली आहे.

कोरोनामुळे मागील 24 तासात तब्बल 794 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77, 567 इतकी झाली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. देशातील बऱ्याच राज्यात करोनाला अटकाव करण्यासाठी वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध सारखे पर्याय अमलात आणले आहेत मात्र त्याचा करोना वाढीच्या वेगावर काही परिणाम होताना दिसत नाही.

दरम्यान दर आठवड्याला कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 5 हजार 926 इतकी झाली आहे. आतापर्यंत एक कोटी 19 लाख 90 हजार 859 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशात सध्या करून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाख 46 हजार 631 इतकी आहे. तर आजपर्यंत कोरोनामुळे 1 लाख 68 हजार 436 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आलेले आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment