हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात कोरोना रुग्णसंख्या आटोकाट आली असतानाच आता चीन आणि हॉंगकॉंग मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट स्टेल्थ ओमिक्रॉनमुळे चीनमध्ये लॉकडाउन करावा लागला आहे. चीन मधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारताची चिंता मात्र वाढली आहे.
२०२० च्या सुरुवातीला ज्याप्रमाणे चीनने तातडीने करोना रुग्णांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालये उभारली होती तशीच धावपळ पुन्हा एकदा आता चीनमध्ये दिसत आहे. तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये बांधण्यास चीनने सुरुवात केलीय. यावरुनच आता पुन्हा एकदा चीनमध्ये आलेली करोनाची लाट किती मोठीय याचा अंदाज बांधता येईल.
भारतात तिस-या लाटेमध्ये 75 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरियंटचे होते. त्यामुळे चीनमधल्या व्हेरियंटचा भारतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं डॉक्टर कुमार यांनी म्हटलंय. मात्र IIT कानपूरमधील तज्ज्ञांनी भारतात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवलाय. चीनमधल्या ताज्या लाटेनंतर भारतातील स्थितीबाबत विविध अंदाज वर्तवले जातायत. त्यामुळे आपल्याला बेसावध राहून चालणार नाहीये.