हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील कोरोना व्हायरस JN.1 व्हेरियन्टच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. देशभरात मागील 24 तासात कोविडच्या ह्या नवीन व्हेरीयंटचे तब्बल 743 रुग्ण आढळून आले असून भविष्यात रुग्ण संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविडचा नवीन व्हेरियंट हा ओमीक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट असून ह्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम देखील ओमीक्रॉन व्हेरियंटच्या तुलनेने कमी आहे.
जेएन.1 हा कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट असून त्यांची संक्रमितता अधिक आहे. त्यामुळे या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. हा व्हेरियंट देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्ये सतर्क आहेत. राज्यांमध्ये कोविड चाचणी, आणि जीनोम सीक्वेंसिंग चाचणी वाढविण्यात आल्या आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात JN.1 प्रकाराची 162 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी सर्वाधिक 83 प्रकरणे केरळमधील आहेत. केरळ व्यतिरिक्त गोवा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक यासह अनेक राज्यांमध्ये JN.1 प्रकार पसरला आहे.
बाहेर जात असाल तर मास्क अवश्य घाला :
सध्या जे प्रकरण समोर येत आहेत त्यात बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असली तरी मृत्यूची संख्या वाढत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या अनेक रुग्णांना आधीच काही ना काही गंभीर आजार होता असे आढळून आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की JN.1 प्रकार संसर्गजन्य आहे, त्यामुळे या प्रकाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, परंतु हा प्रकार धोकादायक किंवा घातकही नाही. तरी देखील वृद्ध, जुन्या कोणत्या तरी आजाराचे रुग्ण आणि गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या ऋतूत बाहेर जाणे टाळा आणि बाहेर जात असाल तर मास्क अवश्य घाला.
जानेवारीपासून प्रकरणे कमी होण्याची अपेक्षा :
देशात कोविडचा उच्चांक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे, जरी काही राज्यांमध्ये जास्त प्रकरणे येण्याची वेळ वेगळी असू शकते. परंतु जानेवारीपासून प्रकरणे कमी होण्याची अपेक्षा आहे. पण तोपर्यंत सतर्क राहण्याची आणि कोविडपासून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे.