कोरोनाचे नियम पायदळी; बजाज कंपनी प्रशासनाचा हलगर्जीपणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. बसमध्ये मोठ्या संख्येने कामगारांना कोंबून ने-आण केली जात आहे. हा सर्व प्रकार गावातील तरुणांनी समोर आणला. एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे बसमध्ये क्षमते पेक्षा अधिक कामगार दिसत असून हा प्रकार त्वरित थांबविण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या बजाज कंपनीतील बहुतांश कामगार हे शहरातील रहिवाशी असून जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव हा शहरातच आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी कामगारांना ने-आन करणाऱ्या वाहनांना नियमावली आहे. मात्र त्या सर्व नियमांना पायदळी तुडवत कामगारांची वाहतूक होत आहे. औद्योगिक वसाहतींना चालना मिळण्यासाठी टास्कफोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी विकेंड लॉकडाऊन ची घोषणा करताना औद्योगिक वसाहती मधील कंपनी, कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र कंपनी प्रशासनच कोरोनाची नियम पळत नसताना दिसत असल्याने आता आशा कंपनी प्रशासन व संबंधितावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरासह वाळूज गावात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आशा परिस्थितीत बजाज कंपनी प्रशासन नियम मोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करून कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याची माहिती गावातील तरुणांना मिळताच त्यांनी थेट बजाज कंपनीच्या गेटवर गाड्यांना अडविले व पाहणी केली असता त्या बस मध्ये कामगारांना अक्षरशः कोंबल्याचे दिसले संतप्त तरुणांनी गावात कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली. कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा गाडी चालू देणार नाही, असा इशारासुद्धा दिला. यावेळी या तरुणांची आणि कंपनीच्या जबाबदारांशी बाचाबाचीसुद्धा झाली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment