सातारा । साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असो वा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरत दारुण पराभूत पत्करणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जवळपास गेले ५० दिवस देश लॉकडाऊनमध्ये आहे. या कठीण परिस्थितीत बिचुकलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एक मोलाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यामुळं बिचुकलेंच पंतप्रधानांना पाठवलेलं हे पत्र सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
कवी मनाचे नेते, सातारा लोकसभा तसेच वरळी विधानसभा अपक्ष नेता असा स्वत:चा उल्लेख करत बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे. मोदींना पाठवलेल्या या पत्रामध्ये बिचुकलेंनी यंदाचे संपूर्ण वर्ष शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचे आदेश मोदींनी द्यावेत असं म्हटलं आहे. शाळा सुरु केल्यास त्या माध्यमातून कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी भिती बिचुकलेंनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता खुद्द बिचुकलेंनी पत्र लिहलं म्हटल्यावर पंतप्रधान मोदी काय निर्णय घेतात याकडे समस्त सोशल मीडियावरील सक्रिय नेटकरी जनतेचं लक्ष लागून आहे.
बिचुकलेंचे पंतप्रधान मोदींना लिहलेलं हेच ते पत्र
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”