धक्कादायक! अमेरिकेमध्ये लॉकडाऊन विरोधात तरुणांनी हातात घेतल्या बंदुका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोनामुळं जगातील इतर देशांसोबतच अमेरिकेत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेले शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आतापर्यंत आठ हजार ८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र असं असतानाही येथील लॉकडाउन उठवण्याची मागणी काही जणांकडून केली जात आहे. न्यूयॉर्क आणि व्हर्जिनीयामध्ये काही तरुण हातामध्ये शस्त्र घेऊन ‘अ‍ॅण्टी लॉकडाउन प्रोटेस्ट’ म्हणजेच लॉकडाउनविरोधी आंदोलन करताना दिसले. अमेरिकेत करोनाचा फैलाव वेगाने होत असतानाच राज्यपालांनी शहरामधील काही भागांमधील बंदी उठवावी अशी या आंदोलकांची मागणी आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या आंदोलकांनी अमेरिकेतील वेगवेगळ्या सेवा पुन्हा सुरु करण्याची म्हणजेच #ReOpenAmerica अशी मागणी केली आहे. बुधवारपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशी आंदोलने केली जात आहेत. ओहियो, नॉर्थ कॅरलॉना, मिशिगन आणि केंटुकीसारख्या भागांमध्ये अनेक नागरिक रस्त्यावर उतल्याचे चित्र पहायला मिळाले. या नागरिकांनी हातामध्ये लॉकडाउन संपवण्यासंदर्भातील बोर्ड पकडलेले होते. यामध्ये ‘भिती घालवा, लॉकडाउन हटवा’, ‘स्वतंत्रपणे जगू किंवा मरु’ अशी घोषवाक्य लिहिलेली होती.

मिशिगन, केंटुकीमधील अनेक आंदोलक हे ट्रम्प यांचे समर्थक असल्याचे वृत्त अनेक वेबसाईटने दिले आहे. मिशिगनमध्ये १० पेक्षा अधिक लोकांनी एका ठिकाणी जमू नये असे आदेश असतानाही अनेकजण या लॉकडाउनविरोधी आंदलोनामध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले, असं ‘व्हॅनिटीफेअर डॉट कॉम’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांपैकी अनेक जण हे तोंडावर मास्क घालून होते. या तरुणांच्या हातामध्ये एआर-१५ आणि एके-४७ सारख्या घातक बंदुका असल्याचे अनेक वेबसाईटने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment