कोरोना हॅल्मेट नंतर आता कोरोना कार, पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडालेला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू जगभर पसरतच चाललेला आहे.जगभरातून रोजच नव्याने संसर्गाच्या आणि मृत्यूच्या बातम्या येतच आहेत.अशा या प्राणघातक विषाणूला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.नुकतेच हैद्राबादच्या रस्त्यांवर या कोरोना विरसच्या आकाराची एक कार धावताना दिसून आली आहे.एक व्यक्तीने या व्हायरसच्या आकारची कार तयार केली आहे.

या कारला एका हैद्राबादमधील सुधाकर यादव नावाच्या एका व्यक्तीने बनविली आहे.टीका कार म्युझिअमचे मालक आहेत.लोकांमध्ये या आजाराची जनजागृती करण्यासाठी हि कार तयार केली असल्याचे सुधाकर यांनी सांगितले आहे.या कारचे डिझाईन आणि मॉडेल अगदी कोरोना सारखेच आहे जसे कि सगळीकडे दाखविले जात आहेत. हिरव्या रंगाच्या या गादीवर स्पाईक देखील लावण्यात आले आहे.

 

सिंगल सीटर असलेली हि कार ४० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल.यामध्ये १०० सीसी चे इंजिन बसविण्यात आले आहे. हि कार बनवायला १० दिवसांचा कालावधी लागलेला आहे. सुधाकर याचे म्हणणे आहे की या कारमुळे लोकांना या व्हायरसप्रती जागृती करण्यास मदत होईल.असं पहिल्यांदाच नाही आहे कि सुधाकर यांनी अशी चमत्कारीत कार तयात केली आहे.याआधीही त्यांनी लोकांमध्ये एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी कंडोमच्या आकाराची कारा तयार केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’. 

इतर महत्वाच्या बातम्या –

https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248162667639889922https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248161070117601281

https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248162667639889922https://twitter.com/HelloMaharashtr/status/1248161070117601281