हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Coronavirus Cases :कोरोना महामारीच्या पहिल्या तीन लाटांमध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत एकूण सक्रिय रुग्णांमध्ये सुमारे अडीच पट वाढ झाली आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 1885 नवीन रुग्ण आढळून आले ज्या नंतर एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 17,480 झाली. सध्या आर्थिक शहर मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
कोरोना विषाणूच्या या वाढत्या प्रकरणांबाबत वैद्यकीय तज्ञ सांगतात की,” बहुतेक रुग्णांमध्ये या आजाराची सौम्य लक्षणे दिसत आहेत. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे. आतापर्यंत या व्हायरसचे कोणतेही नवीन चिंताजनक रूप दिसले नाही.”तज्ञांनी पुढे सांगितले की,” या सर्व रुग्णांना पॅरासिटामॉल दिले जात आहे.” तसेच हि सौम्य लाट असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. Coronavirus Cases
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 9,354 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 5,980 रुग्ण हे मुंबईतील होते. तसेच गेल्या महिन्यात या संसर्गामुळे 17 जणांचा मृत्यू झाला होता. याबरोबरच 1 ते 12 जून दरम्यान राज्यात 23,941 बाधित आढळले आहेत, त्यापैकी 14,945 फक्त मुंबईतील आहेत आणि या कालावधीत 12 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. Coronavirus Cases
मुंबईतील सरकारी जेजे रुग्णालयातील औषधाचे सहायक प्राध्यापक डॉ सुनील भैसारे यांनी पीटीआयला सांगितले की,” कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, मात्र सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.” ते म्हणाले की,” देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी येतात. तसेच इथे मास्क लावण्याव्यतिरिक्त इतर सर्व निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. मात्र केसेस वाढत असले तरीही काळजी करण्यासारखे काही नाही.” Coronavirus Cases
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://mohfw.gov.in/
हे पण वाचा :
Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!
EPFO मध्ये ई-नॉमिनेशन कसे करावे ते जाणून घ्या