अरे बापरे! हिंगोलीत एकाच दिवसात २५ SRPF जवान कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यात एसआरपीएफच्या आणखी २५ जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं येथील रुग्णांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान आहेत. याआधीही मुंबई, मालेगाव व जालन्याहून हिंगोलीत परतलेल्या एकूण १६ जवानांना करोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यात आता २५ जवानांची भर पडली आहे.

दरम्यान, आज शुक्रवार सकाळी एसआरपीएफच्या २५ जवानांनचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी २० जवानांना एसआरपीएफच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर ५ जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. या जवानांचे यापूर्वीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आतापर्यंत एसआरपीएफच्या ४१ जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ३३ जवान हे मालेगावात तर ८ जण मुंबईत कर्तव्यावर होते, असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील १९४ जवान व अधिकारी मुंबई व मालेगाव येथे बंदोबस्ताची ड्युटी संपवून १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात परत आले होते. त्यापैकी १५ जणांना करोनाची बाधा झाल्याचं उघड झालं आहे. तर, जालना येथील एक जवान गावाकडे परतल्यानंतर केलेल्या तपासणीत तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील इतर दोन व्यक्तींनाही करोनाची लागण झाली आहे. तर, वसमत व सेनगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याची रुग्ण संख्या कालपर्यंत २१ होती. मात्र आज त्यात एकदम २५ जणांची भर पडली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील खासगी ट्रॅव्हल्सवरील चालक २३ एप्रिल रोजी पंजाब राज्यात भाविकांना सोडण्यासाठी गेला होता. २८ एप्रिल रोजी तो परत आला होता. या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. तर हिंगोलीच्या एका रुग्णावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

You might also like