वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसने बलाढ्य अशा अमेरिकेला बेजार केलं आहे. कोरोनाने अमेरिकेला गुडघे टेकायला लावले आहे. कोरोनाने अमेरिकेची कोंडी केली असून यातून सुटका करण्यासाठी अमेरिकेला हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाची गरज आहे. भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध साठा पुरवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र, आता भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या औषधाच्या ऑर्डरवरील बंदी भारत उठवणार नाही, यासाठी असं होणार नाही. मला कल्पना आहे की भारताने हे औषध इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. आमच्यात चांगला संवाद झाला. भारताचे अमेरिकेसोबत संबंध कायमच चांगले राहिले आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. हे औषध अमेरिकेला देण्यासंदर्भात विचार करु, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्याबाबत ट्रम्प म्हणाले की, “रविवारी सकाळी आमच्यात बातचीत झाली होती. तुम्ही आम्हाला औषध दिलं तर निश्चितच या निर्णयाचं कौतुक करु. मात्र हे औषध अमेरिकेला देण्यासाठी परवानगी दिली नाही तर ठीक आहे, परंतु निश्चितच याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं आणि असं का होऊ नये?” अशा शब्दात ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे.
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे मलेरियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं औषध आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरही हे औषध फायदेशीर ठरत आहे.कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. आता हे औषध कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी आधी विनंती आणि आता धमकी दिली आहे. कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. इटली, स्पेनसारख्या विकसित देशांनीही या व्हायरसमोर गुडघे टेकले आहेत. आता महासत्ता असलेल्या अमेरिकेची नजरही आता भारताकडे आहे. भारताकडून मदत मिळण्याची आस अमेरिकेला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?