दिलासादायक! मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांची घट

0
37
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचे केंद्रबिंदू बनलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभरात कोरोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील कोरोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ रुग्णांचा मृत्यू होत होता.

पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मुंबईत आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा दोन अंकी होता. काल बुधवारी ही संख्या केवळ दोनवर आली आहे. काल मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातली कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं.

काल राज्यात २३२ नवे रुग्ण सापडले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा ३४ टक्क्याने कमी होता. त्याशिवाय काल दिवसभरात राज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसातील ही संख्याही सर्वात कमी आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढून ३ हजार ८१ झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here