हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या करोनाबाधित रुग्णावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. मुंबईसह अनेक शहरातील गर्दी ओसरली असून, करोनाला तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्यापूर्वी थांबवण्याचे प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून केले जात आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गाची प्रकरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून संबोधन केलं. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.