नवी दिल्ली । लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.
73 deaths and 1897 new cases in last 24 hours due to #Coronavirus, the sharpest ever increase in death cases in India. https://t.co/5PP3jVpzaj
— ANI (@ANI) April 29, 2020
देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”