मध्य प्रदेशात जैन साधूंच्या स्वागतासाठी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर; रस्त्यावर लोकांची तुडुंब गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सागर, मध्यप्रदेश । देशभरात कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण मिळवता आलं आहे. त्यामुळं गेले दीड महिन्यापेक्षा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. याकाळात कुठल्याही सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सवानिमित्त एकत्र येण्याला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या काळात घातलेले निर्बंध धाब्यावर बसवून धार्मिक कारणांवरून लोक एकत्र येत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करून कोरोना संसर्गाला हातभार लावणारा प्रकार घडला आहे. या ठिकाणी जैन साधू प्रमाणसागर यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी जमा होऊन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

जैन साधू प्रमाणसागर आपल्या २० अनुयायांसोबत सागर जिल्ह्यातील बांदा येथे पोहोचले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. एएनआयने गर्दीचा व्हिडीओ ट्विट केला असून यावेळी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे.मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचा आदेश दिला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण भुरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जर सोशल डिस्टन्सिंग आणि जमावबंदीच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असेल तर कारवाई योग्य करण्यात येईल अशी माहिती भुरिया यांनी दिली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. मध्य प्रदेशात कोरोनाचे ३९८६ रुग्ण असून २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. इंदूर, भोपाळ, उज्जैन आणि खांडवा ही राज्यातील प्रमुख शहर कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. अशात सागर जिल्ह्यात एका जैन साधूसाठी जमलेली गर्दी राज्यातील कोरोनाचे संकट आणखी वाढवणारी ठरू शकते.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment