रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू शारापोव्हाने लॉकडाउनला कंटाळून शेअर केला थेट फोन नंबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी लढा द्यायचा प्रयत्न करत आहे.त्यासाठी अनेक उपाययोजनाही राबवण्यात येत आहेत.कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.कोरोनाचा फटका क्रीडा जगतालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अनेक खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. अशात काही खेळाडू आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत, तर काही व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांशी संपर्क ठेवून आहेत तर काही खेळाडू सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

लॉकडाउनमुळे काही खेळाडू अगदी कंटाळलेले दिसून येत आहेत. अशातच ५ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने चक्क आपला फोन नंबर शेअर केला आहे. मारिया शारापोव्हाने तिच्या ट्विटर हँडलवर आपला फोन नंबर शेअर केला. तिने फोन नंबर शेअर करताना ‘मला तुमच्याशी बोलायला आवडेल. या लॉकडाउनच्या काळातील तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा. मी तुमच्यासोबत माझा नंबर शेअर करत आहे’, असे सांगितले आणि तिने खरोखरच आपला नंबर शेअर केला.

 

आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने २ वेळा फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन,अमेरिकन ओपन व विम्बल्डन एकएकदा या स्पर्धांची विजेतेपदं पटकावली. पण वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी शारापोव्हाने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. शारापोव्हाच्या या निर्णयाची अनेकांना कल्पना नव्हती. त्यामुळे तिच्या या निर्णयानंतर चाहत्यांना धक्का बसला.आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याशिवाय ती एक मादक टेनिसस्टार म्हणूनही चर्चेत राहिली.

मारिया शारापोव्हाचा जन्म २६ एप्रिल १९८७ साली सर्बिया येथे झाला. शारापोव्हाने रशियात चार वर्षांची असताना टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती. ३ वर्षांनंतर १९९४ मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेत आले. त्यामुळे अमेरिकेत शारापोव्हाने टेनिसचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. २००२ साली मारिया शारापोव्हाने ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनिअर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती सर्वात तरूण टेनिसपटू ठरली होती. शारापोव्हाने २००४ साली १७ वर्षांची असताना विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँडस्लॅम पटकावले. त्या सामन्यात तिने अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सला पराभूत केले होते.

Maria Sharapova RETIRES from tennis aged 32 after controversial ...

२००४ याच वर्षी मारिया शारापोव्हा हिने Women’s Tennis Association च्या टॉप १० मध्ये प्रवेश केला. २००६ साली वयाच्या १९ व्या वर्षी मारिया शारापोव्हाने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. २००८ साली तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, तर २०१२ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने तिने विजेतेपदाचा स्लॅम पूर्ण केला. असा पराक्रम करणारी ती १० वी महिला टेनिसपटू होती. २०१३ साली सलग ९ वर्षे सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत शारापोव्हाला अव्वल स्थान मिळाले होते. २०१६ साली शारापोव्हा उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी दोषी आढळली. त्यामुळे तिच्यावर २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण नंतर ही बंदी कमी करून १५ महिन्यांवर आणण्यात आली होती. २०१७ साली शारापोव्हाने बंदीची शिक्षा संपल्यावर टेनिसमध्ये पुनरागमन केले. पण त्यानंतर तिला कारकिर्दीत फारशी चमक दाखवता आली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

 

Leave a Comment