नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासात भारतात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील २४ तासात १४८ मृत्यूंची नोंद झाली असून देशातील मृतांची एकूण संख्या ३५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४०.९७ टक्के आहे.
या राज्यात आढळत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
गेल्या २ दिवसांपासून देशात रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून गुरुवारी २४ तासांत ५,६०९ नवे रुग्ण आढळले होते. देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला असून रुग्णसंख्या ४१ हजारावर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू (१३,९६७), गुजरात (१२,९०५) यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्य कोरोनाचे ११ हजार ६५९ रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाचे ६२७७ रुग्ण असूम यामधील ३४८५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ५९८१ करोना रुग्ण असून २४८३ रुग्ण बरे झाले असून २७० जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून देशात अशी वाढली कोरोना रुग्णांची संख्या
देशात पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजे १५ मार्च रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली. तर भारताने १ हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे २९ मार्च रोजी गाठला तर १३ एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या १० हजारांवर गेली. ६ मे रोजी बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी २ आठवड्याहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे तर तर ३.३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि १९ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”