मुंबई । राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपाच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय अशा शब्दात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या कोरोना संकट काळातील भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झाला असून त्याविरोधात एका भाजपा नेत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर पालघर घटनेवरुनही देवेंद्र फडणवीस ते भाजपचे बरेच वरिष्ठ नेते राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयन्त करत आहेत. याच पार्श्वभुमीवर रोहित पवार यांनी भाजपाच्या राजकारणावर संताप केला.
रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला हा संताप व्यक्त करत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “राज्य करोनाशी लढतंय अन् भाजपाच्या नेत्यांना राजकारणाचं पडलंय. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात. पण कोर्टानेच स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा! आज एकीकडं भाजपाचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे”. दरम्यान, रोहित पवार यांच्या संतापामागे मुख्य कारण म्हणजेएका भाजपा नेत्याने उच्च न्यायालयात दाखल केलीली याचिका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या ठरावाच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी याचिका एका भाजपा नेत्याने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व पुणे येथील व्यापारी रामकृष्ण ऊर्फ राजेश गोविंदस्वामी पिल्लई यांनी ही याचिका दाखल केलीआहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर सोमवारी दूरचित्रसंवादाच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यामातून या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. प्रकरण समजून घेत या याचिकेवर तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. मंत्रिमंडळाचा शिफारशीचा प्रस्ताव मान्य करायचा की नाही यावर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या स्थितीत याप्रकरणी हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे न्यायालयाने दिलासा नाकारताना नमूद केले.
”WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”