कोरोनाच्या लढ्यात लता दिदींचा उद्धव ठाकरेंना आशीर्वाद; जिजाऊ-शिवबांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ”शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि मला खात्री आहे की कोरोनाच्या या संकटावरही महाराष्ट्र यशस्वीपणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगती करत राहील,” असं म्हणत लता दीदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील एका संवादाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

दरम्यान, आज महाराष्ट्रात दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र  कोरोनाची लढाई यशस्वी करण्याच्या दिशेनं कसे प्रयन्त करत आहे याची माहिती दिली. तसेच राज्यात कोरोनाचे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा जनता संवाद टीव्हीवर आज लता दीदी सुद्धा पाहत होत्या. म्हणून यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या माहितीबाबत समाधान व्यक्त करत लता दीदींनी आणखी एका करत त्या ट्विटमध्ये लिहलं कि, “नमस्कार…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. आज उद्धवजींनी सांगितले की, या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत, हे ऐकुन समाधान वाटले,” असं लता दीदींनी ट्विटमध्ये म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनीही यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना लता मंगेशकर यांची एक आठवण सांगितली आहे. “मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याचाही सहभाग होता. हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं,पण आता नाईलाज आहे. लतादीदींनी २०१० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी बीकेसीतील मैदानात ‘बहु असोत सुंदर’ गाणे गायल्याची आठवण झाली, आज त्याच जागी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

Leave a Comment