आजच्याच दिवशी लिस्ट ए किंवा एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात झाली,जाणून घ्या पहिला सामना किती षटकांचा होता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यास सुरुवात झाली, ज्यामध्ये भारतीय फलंदाजांनी,विशेषत: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने आपली खास छाप सोडली.नवीन प्रेक्षकांना क्रिकेटशी जोडण्यासाठी इंग्लंडने क्रिकेटचे हे नवीन स्वरूप सुरू केले आणि पहिला सामना लॅंकेशायर आणि लीसेस्टरशायर यांच्यात १ मे १९६३ रोजी खेळला गेला.

या सामन्यावर पावसाचा परिणाम झाला आणि दुसर्‍या दिवशी (राखीव दिन) याचा निकाल लागला.आजच्याप्रमाणे हा सामना ५० षटकांचा नाही तर ६५ षटकांचा होता, ज्यामध्ये लॅंकेशायरचा पीटर मार्नर शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला तर ब्रायन स्टॅथम (२८ रन २ विकेटस) च्या शानदार गोलंदाजीसह लँकशायरने १०१ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

The Definitive: Dennis Amiss | All Out Cricket | England Cricket

क्रिकेटच्या या नवीन फॉरमॅटला लिस्ट ए असे नाव देण्यात आले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय रूपाला वनडे हे नाव दिले गेले.काहींनी याला इन्स्टंट क्रिकेट ही म्हटले आणि समीक्षकांनी यावर ‘पायजामा क्रिकेट’ अशी टीका केली.यानंतर क्रिकेटमध्ये टी -२० सारखे लहान स्वरुप जोडले गेले.

लिस्ट ए क्रिकेट या नंतर खूप पुढे गेले.यामुळेच क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपचेही आयोजन करण्यात आले होते,तर काही क्रिकेटर्सना आपली खास कामगिरी दाखविण्याची संधी मिळाली.मर्यादित षटकांच्या या क्रिकेटमुळे सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके पूर्ण केलीत.

सचिनने एकदिवसीय सामन्यात ४९ शतकांच्या मदतीने १८४२६ धावा केल्या आहेत.ग्रॅहम गूच (२२२११) आणि ग्रॅम हिक (२२०५९) नंतर लिस्ट ए मधील फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Graeme Hick's 405: 30 years on, an oral history of an era-defining ...

सचिनने लिस्ट ए मध्ये २१९९९ धावा केल्या आहेत ज्यामध्ये ६० शतके झळकावली आहेत जो एक विश्वविक्रम आहे.शतकांच्या बाबतीत कोहली सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो त्याच्या नावावर ४७ शतके जमा आहेत.कोहलीने आतापर्यंत २८२ सामने खेळून लिस्ट ए मध्ये १३,३०९ धावा केल्या आहेत.हिकने ६५१ सामने तर गूचने ६१३ सामने खेळले आहेत.

तेंडुलकरसह (५५५) एकूण १४ खेळाडूंनी ५०० किंवा त्याहून अधिक लिस्ट ए सामने खेळले आहेत.एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने जरूर सर्वोच्च धावसंख्या केली असेल,पण लिस्ट ए मधील विक्रम मात्र इंग्लंडच्या अ‍ॅलिस्टर ब्राउनच्या नावावर आहे.त्याने ओवल येथे २००२ मध्ये सरेकडून खेळताना ग्लोमर्गनविरुद्ध २८८ धावा केल्या.

कोलकात्यात रोहितचा श्रीलंकेविरुद्ध केलेल्या २६४ धावांची नोंद या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.लिस्ट ए मध्ये सर्वाधिक विकेटस पाकिस्तानच्या वसीम अक्रम (८८१) च्या नावावर नोंदवल्या गेल्या पण सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा विक्रम एक भारतीय शाहबाज नदीमच्या नावावर आहे.

त्याने झारखंडविरुद्ध २०१८-१९ च्या मोसमात राजस्थानविरुद्ध दहा धावा देऊन आठ विकेट्स घेतल्या होत्या.नदीमने दुसर्‍या भारतीय राहुल सिंघवीचा विक्रम (१५ धावा देऊन आठ विकेट्स, दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश,सन १९९७-९८) मोडला होता.

अनिल कुंबळे (५१४) हा लिस्ट ए मधील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.भारताचा आणखी एक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्टंप्स (१४१) चा विश्वविक्रम नोंदविला आहे. इंग्लंडचा स्टीव्ह रोड्स हे यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी (६६१) घेणारे ठरले.

Anil Kumble, - CricketAddictor

अद्याप कोणत्याही संघाने लिस्ट ए मध्ये ५०० धावा केलेल्या नाहीत.सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सरेच्या नावावर आहे,त्यांनी २००७ मध्ये ओव्हलवर ग्लॉस्टरशायरविरुद्ध ४९६ धावा केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment