चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशातील करोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ झाल्याची माहिती कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी २ हजार ६५० जण करोनाबाधित असून १८३ जण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहे. करोनाची बाधा झाल्याची शहानिशा करण्यासाठी मागील २४ तासांमध्ये देशात आठ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.

तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, आज ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात करोनाचे एकूण ४७ नवे रूग्ण आढळले आहेत. यापैकी २८ मुंबईतील, १५ ठाण्यातील, २ पुण्यातील, तर अमरावती व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक आहे. अशी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या नवीन रुग्णांच्या नोंदीनंतर राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण