आता मारुती-सुझुकी बनवणार व्हेंटिलेटर; १० हजार व्हेंटिलेटरचे लक्ष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने देशात व्हेंटिलेटरची कमतरता पाहता भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना व्हेंटिलेटर बनविण्याची विनंती केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती-सुझुकीने आता व्हेंटिलेटर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मारुती-सुझुकी व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य उपकरणांच्या निर्मितीमध्ये सरकारला सहाय्य करणार आहे. त्यासाठी मारुतीने AgVa हेल्थकेअर बरोबर काही करार केले आहेत.

AgVa हेल्थकेअर व्हेंटिलेटर उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. व्हेंटिलेटरच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी मारुती AgVa हेल्थकेअरसोबत मिळून काम करणार आहे. AgVa हेल्थकेअर आणि मारुतीने मिळून महिन्याला १० हजार व्हेंटिलेटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्हेंटिलेटरची टेक्नोलॉजी, परफॉर्मन्स आणि त्यासंबंधीचे इतर विषय उत्पादन, विक्रीची जबाबदारी AgVa हेल्थकेअरची असेल.

व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी लागणाऱ्या सुट्टया भागांसाठी मारुती आपल्या सप्लायर्सचा वापर करणार आहे. व्हेंटिलेटर्सचे मोठया प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी फायनान्सची व्यवस्था आणि सर्व आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी मारुती सुझुकी मदत करणार आहे. करोनामुळ देशातील परिस्थिती चिघळल्यास अशा परिस्थितीत भारततच नव्हे तर संपूर्ण जगभरात व्हेंटिलेटरच्या मागणीत वाढ झाली आहे. कोरोनाशी मुकाबला करतांना लोकांचे प्राण जर वाचवायचे असतील व्हेंटिलेटर शिवाय पर्याय नाही. त्यामुळं अमेरिका आणि ब्रिटन या देशांनी त्या देशातील वाहन उद्योग कंपन्यांना व्हेंटिलेटरची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायची विनंती केली आहे. भारताने सुद्धा देशात व्हेंटिलेटरची कमतरता पाहता भारतातील वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना व्हेंटिलेटर बनविण्याची विनंती केली होती. त्याला मारुती-सुझुकीने प्रतिसाद देत आता व्हेंटिलेटर बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment