नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील २४ तासांचा कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास कोरोनाबाधितांची संख्येत पाहिजे तशी घाट अजूनही होताना दिसत नाही आहे. मागील २४ तासात देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी आधीच १ लाखांचा टप्पा गाठला आहे.
देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले 63 हजार 624 रुग्ण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 435 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे. जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी केला गेला. एक लाख लोकसंख्येमागे जगभरात 62.3 करोना रुग्ण आढळले पण भारतात ही संख्या केवळ 7.9 इतकीच होती, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.
भारतात वैद्यकीय हाताळणी प्रभावीपणे केली जात असल्याने एक लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण फक्त 0.2 टक्के आहे. जगभरातील सरासरी4.2 टक्के असल्याचे अग्रवाल म्हणाले. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी 2.9 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून 3 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 0.45 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
Spike of 5,609 #COVID19 cases & 132 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 112359, including 63624 active cases & 3435 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/NTJ4SXz9qZ
— ANI (@ANI) May 21, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”