९ महिन्यांची गर्भवती महिला करोना पॉझिटिव्ह, डॉक्टरांसमोर प्रसूतीचं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमधील एम्स रुग्णालयामधील डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असताना आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर अली आहे. सदर कोरोनाबाधित डॉक्टरची ९ महिन्यांची गर्भवती असलेली पत्नीही करोना पॉझिटिव्ह असल्याचं तपासणीत समोर आलं आहे. उपचारासाठी महिलेला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिथेच तिची प्रसूती केली जाणार आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीत महिलेच्या डॉक्टरांसमोर प्रसूतीचं मोठं आव्हान आहे.

एम्स रुग्णालय प्रशांकडून मिळलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रसूती करताना सर्व काळजी घेणार असल्याचं एम्स रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच करोनाबाधित गर्भवती महिलेची प्रसूती करताना सर्व प्रोटोकॉल डॉक्टरांकडून पाळले जातील. सुरक्षेसाठी डॉक्टर पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षक उपकरणे यांचा वापर करणार आहेत जेणेकरुन करोनाची लागण होण्याची भीती राहणार नाही, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, एम्स रुग्णालयात फिजीओलॉजी विभागात काम करणाऱ्या डॉक्टर असलेल्या महिलेच्या पतीला करोनाची लागण झाली आहे. त्याला सध्या रुग्णालयामधील खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. तसंच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी केली जात असून घरी क्वारंटाइन म्हणजेच विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांचीही तपासणी होत असून नमुने पाठवण्यात आले आहेत अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. डॉक्टरने कुठेही परदेशात प्रवास केला नसल्या कारणाने त्याला करोनाची लागण नेमकी कशी झाली याचा तपास केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता