पुणे प्रतिनिधी | शहरात महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पुण्यातील कोरोना रुग्नांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आज पिंपरि चिंचवड येथे नवीन कोरोना रुग्न सापडल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. सदर युवक अमेरिकेहून प्रवास करुन आला होता. येताना त्याचे विमान दुबईहून आले होते असे म्हैसकर यांनी सांगतके. तसेच सदर युवकाच्या संपर्कांत कोण कोण आले होते याची माहिती आम्ही घेत आहोत असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मागील २४ तासात केवळ एक कोरोनारुग्न सापडल्याने आपण कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य नियोजन करत आहोत असे दिसत आहे. पुण्यात जिथे परिक्षा सुरु आहेत अशा ठिकाणी बस सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वेने २२ गाड्या रद्द केल्याच्या पार्श्वभुमीवर आम्ही बससेवा सुरळीत राहील याची काळजी घेत आहोत.
ब्रेकिंग बातम्या आता थेट मोबाईलवर मिळवा. आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News
हे पण वाचा –
करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक
करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित
करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!
करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद
‘या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न