मुंबईत कोरोना मृत्यूने गाठली शंभरी,करोनाग्रस्तांची संख्या दीड हजार पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबई हे राज्यातील कोरोनाच केंद्रबिंदू बनलं आहे. आज मुंबईत दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत करोनाची लागण झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या ९ जणांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते तर २ जण वयोवृद्ध होते.तर दुसरीकडे मुंबईत आज करोनाचे १५० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुबंईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १ हजार ५४९ वर पोहोचली आहे.

मुंबईसाठी काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत आज एकाच दिवशी ४३ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत मुंबईतील एकूण १४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. अन्य आकडेवारीवर नजर मारल्यास मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले २५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा एकूण रुग्णांची संख्या आता ४७३३ इतकी झाली आहे.

मुंबई शहर हे रेड झोनमध्ये गेलं आहे. कारण महाराष्ट्रात मुंबई आणि त्यानंतर पुणे या दोन शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवांची दुकानं सुरु राहणार आहेत. मात्र त्यासाठी वेळेची मर्यादा असणार आहे. तसंच कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment