मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता ३०२ वरुन ३२१ वर पोहोचला आहे. मुंबईत १६ तर पुण्यात २ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिथे जिथे कोरोनाचे पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तो भाग बृहमुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. तसेच मुंबईत काल एका कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोना बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यात आता अनेकांची कोरोना चाचणी घेतली जात आहे. यामुळे येत्या काही काळात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न
जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन
तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका