तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेक्षणात मनपाची; शाळा ठरली मराठवाड्यातून अव्वल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय अंतर्गत सलाम फाऊंडेशनच्या तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेत मिटमिटा येथील मनपा शाळा मराठवाड्यातून अव्वल ठरली असून सर्वत्र या शाळेने एक वेगळा आदर्श घडवून दिला आहे.

भारत सरकार, आरोग्य मंत्रालयाअंतर्गत तंबाखूमूक्त नियंत्रण शाळा अभियान मार्गदर्शक सूचनानूसार पडेगाव, मिटमिटा येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा यांनी उपक्रम राबविले. यात विद्यार्थी, पालक, समाज, परिसर आदींनी सहभाग घेवून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते. हा उपक्रम राबविण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व भारत सरकार आरोग्य मंत्रालय, मनपा औरंगाबाद यांच्या संयूक्त विद्यमाने महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील  विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रभावीपणे नऊ निकष ठरवून पोस्टर स्पर्धा, गावकरी, पालक, विद्यार्थ्यांचे  प्रबोधन करुन तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला. हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी सलाम मुंबई फाउंडेशन व मिटमिटा मनपा शाळेने स्वीकारली होती. यात मनपा शाळाकडून हे सर्व निकष पूर्ण करुन १०० पैकी १०० गुण मिळवून मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळवला आणि तंबाखू नियंत्रणात टोबॅको फ्री स्कूल म्हणून अव्वल स्थान मिळविले आहे.

मनपा शाळेच्या मूख्याध्यापिका आर.सी. हिवाळे, शिक्षक देवरे, पंडीत, तडवी, जाधव व औरंगाबाद येथील मुंबई सलाम फाऊंडेशनचे समनव्यक संदीप वाहूळ यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, मिटमिटा शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बनकर, अ‍ॅड. अशोक मुळे, शिवाजी गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group